Skip to content

CALL US : +91- 9096501987

Menu

बायबलला समजून घ्या ! देवाला ओळखा.

21/08/2025
Ps. Shekhar

बायबलला युनानी भाषेत बिबलोस म्हणतात. याचा अर्थ ” एक पुस्तकं ” बायबलला दुसऱ्या नावानेही ओळखले जाते. धर्मशास्त्र, पवित्रशास्त्र, परमेश्वराचे वचन,

📖 बायबल 66 पुस्तकांचा संच आहे.

📖 बायबल दोन विभागात विभागले आहे.

  1. जुना कारार.
  2. नविन कारार.
    जुना करार येशूच्या आगमना अगोदर लिहिला. नवीन करार येशूच्या आगमना नंतर लिहिला.

📖 जुन्या करारात 39 पुस्तके आहेत. जुना करार इब्री, आरामी भाषेत लिहिला.

📖 नवीन करारात 27 पुस्तके आहेत.नवा करार युनानी भाषेत लिहिला.

📖 बायबल लिहिण्यासाठी 1600 वर्षे लागली.

📖 पवित्रआत्म्याच्या मार्गदर्शना नुसार राजे, राजकुमार, कवी, भविष्यवक्ते, राजनेते यांनी बायबल लिहिले.

📖 बायबलचे वर्गिकरण.

  • जुनाकरार 39 पुस्तके. त्यापैकी
  1. नियमशास्त्र यात 5 पुस्तके आहेत. उत्पत्ती ते अनुवाद.
  2. ऐतिहासिक पुस्तके 12 आहेत यहोशवा ते ऐस्तेर.
  3. कवितेची 5 पुस्तके आहेत. ईयोब ते गीतरत्न व विलापगीत.
  4. भविषवानीची 16 पुस्तके आहेत. यहेजकेल ते मलाखी.
  • नविनकारार…27 पुस्तके.
  1. शुभवर्तमान 4 पुस्तके. मत्तय ते योहान.
  2. ऐतिहासिक 1 पुस्तक. प्रेषितांची कृत्ये.
  3. पत्रे..21
  4. भविष्यवांनीचे 1 प्रगटीकरण..

📖 बायबलचा मुख्य विषय येशु ख्रिस्त आहे.

📖 बायबल मध्ये देवाचा स्वभाव, व उद्देश प्रगट केला आहे. बायबल अनंतकालिक जीवनासाठी मार्गदर्शक पुस्तक आहे.

📖 बायबल हे एकमेव असे पुस्तक आहे की मनुष्य दुःखात, संकटात, व मरणाच्या वेळी या कडे आकर्षित होतो. जगातील सर्व भाषेमध्ये बायबल लिहिले आहे.

📖 सर्वात जुने पुस्तक असूनही जगभरात याची प्रचंड विक्री होते. दररोज विक्री केले जाणारे एकमेव पुस्तक आहे.जगातील सर्व भाषेत उपलब्ध असलेले एकमेव पुस्तक आहे ,लोकांचे जीवन बदलून टाकणारे पुस्तक आहे .

📖 येशूख्रिस्त, पवित्रआत्मा याच्यानंतर बायबल देवाने मनुष्याला दिलेली अनमोल भेट आहे.

📖 अद्भुतरित्या बायबल आपल्या पर्यंत आहे. पुरातन काळापासून बायबलला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे पण आजही बायबल सर्व जगात आहे. कारण हे देवाचे पुस्तक आहे.

📖 बायबल मनुष्यजातीला देण्याचा देवाचा उद्देश म्हणजे लोकांनी पापापासून दूर रहावे, कुमार्गापासून मागे फिरावे. पापांची क्षमा प्राप्त करून घ्यावी, देवाची ओळख करून घ्यावी व नवीन जीवन जगावे.

📖 जगाच्या समाप्ती नंतर सर्व मनुष्यांचा न्यायनिवाडा बायबल नुसार केला जाणार आहे. आजच बायबलला आपला साथी बनवा. देवाचे प्रेम, दया, क्षमा, मनुष्यासाठी देवाने केलेला त्याग याचे रोमहर्षक, अद्भुत वर्णन बायबल मध्ये केले आहे. बायबल जीवन बदलणारे पुस्तक आहे. बायबल देवाचे पुस्तक आहे . बायबल पृथ्वी वरील सर्व लोकांना देवाने हिलीलेले प्रेम पत्र आहे. 

प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरता उपयोगी आहे, ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. 2 तीमथ्य 3:16‭-‬17