आज मनुष्य पापाला थट्टेत लोटतात, पाप ही मानवाची दुर्बलता आहे, प्रकृती आहे असे समजतात. आम्ही पापाची भयानकता समजून घेतली पाहिजे. जेव्हा पापा विषयी समजूतदार पणा जागृत होतो तेव्हा मनुष्य देवाच्या दयेसाठी परमेश्वराकडे फिरतो.
- पाप म्हणजे, दैवी नियम मोडणे
- पाप हे एक कार्य आहे… उदा. उल्लंघन करणे.
- पाप ही एक स्तिथी आहे… धार्मिकते पासून दूर ठेवते.
- पाप एक स्वभाव आहे… परमेश्वरा विरुद्ध.
- पापाचा उगम सैतानापासून आहे… त्याने देवाविरुद्ध बंड केली.
- जगातील पहिला मनुष्य आदामा द्वारे पाप या जगात आले.
पापाचे परिणाम :
- मरण : कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.
[रोमकरांस पत्र 6:23].
- देवापासून दूर नेते…
- भयंकर दंड…
- दोषात सापडतो.
- अनंत अग्नीची शिक्षा..
- नरक दांडाची शिक्षा..
मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा.[ मत्तय 25:41].
अग्नीच्या सरोवरात टाकले जाण्याची शिक्षा..ज्या कोणाचे नाव ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही’ तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. [प्रकटी 20:15].
पापाचा इलाज :
- केवळ येशु ख्रिस्तच यावर उपाय आहे. बायबल सांगते..तुम्हांला माहीत आहे की, आपली पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला; [1योहान 3:5]
- तर तू आपणांस खाराने धुतले व आपणास पुष्कळसा साबण लावला तरी माझ्या दृष्टीने तुझ्या पापाचा डाग तसाच राहील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. [यिर्मया 2:22].
- आमची पापें चांगल्या कर्मानी,दान धर्मानी, बकऱ्याच्या, कोंबड्याच्या रक्तानी धुतली जाऊ शकत नाहीत. कारण हे अशुद्ध रक्त आहे. केवळ येशूचेच रक्त आम्हाला शुद्ध करू शकते. पाप क्षमा देऊ शकते.
- त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती, म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा, आपल्याला मिळाली आहे.
