जीवन हे शरीर व आत्मा यांचा संयोग आहे. जीवन हे थोडया वेळासाठी देवाने दिलेली देणगी आहे. जीवन हे अभौतिक नष्ट होणारी वस्तू आहे, जीवन हे आज आहे उद्या नसणार आहे.
जीवनाचा उगम :
आम्हाला जीवन हे आईवडिलांकडून मिळाले आहे. त्यांनाही त्यांच्या आईवडिलांकडून मिळाले पण जीवन हे कोठून आहे?
बायबल सांगते जीवन हे देवा पासून आले याची सुरवात एदेन बागेतून झाली.मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. [उत्पत्ती 2:7]
जीवन हे परमेश्वराची विशेषतः आहे. त्याच्याजवळ सर्व कालिक जीवन आहे.
आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे, आणि जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठायी, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या ठायी, आपण आहोत. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे.
[1 योहान 5:20].
जीवनाचे प्रकार :
- शारीरिक जीवन : जग निर्मितीच्या वेळेस मनुष्यांना दिले.
- आत्मिक जीवन : हे नवीन जीवन आहे. येशूवर विश्वास ठेवल्याने आम्हाला मिळते.
- अनंत जीवन : अनंत जीवन मिळवण्यासाठी देवाने आम्हाला शारीरिक जीवन दिले आहे. आणी हे जीवन मिळवण्यासाठी आम्हाला प्रथम आत्मिक जीवनाची गरज आहे.
जीवनाचा काळ :
बायबल सांगते नोहाच्या वेळी जलप्रलय होण्यापूर्वी मनुष्याचे आयुष्य 930 वर्षे इतके होते. आणी जल प्रलया नंतर.देवाने मनुष्यांना जीवनाचा काळ 120 वर्षे इतका दिला पापामुळे देवाने जीवनाचा कालावधी कमी केला. मोशेच्या काळी जीवन हे 70 ते 80 वर्षा पर्यंत आले.
बायबल सांगते स्त्री पासून जन्मलेला मनुष्य अल्प आयुषी व क्लेश भरीत असतो.
[ईयोब 14:1 ] कारण तुझ्या दृष्टीने सहस्र वर्षें कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत. आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. [स्तोत्रसंहिता 90:4, 10].
जीवनाची तुलना :
- जीवन हे यात्रे सारखे आहे – यात्रा एका दिवसात संपते. ती कायमस्वरूपी नसते. जीवन ही असेच आहे. हे एक दिवस संपणार आहे. कायम स्वरूपी जीवन हे कोणालाच दिलेले नाही.
- जीवन हे एक स्वप्न आहे – तुम्हाला पडलेले स्वप्न सकाळी नष्ट होते. तुम्ही स्वप्नाला पुन्हा स्वप्नात आणू शकत आहे. जागा झालेल्या मनुष्याला स्वप्न निरर्थक वाटते. जीवन हे क्षण भंगूर आहे छोटे आहे.
- जीवन हे सावली सारखे आहे – संपूर्ण दिवस भरात आमची सावली कमी जास्त होत असते. तसेच काही मनुष्य अधिक जगतात तर काही कमी. बायबल सांगते मनुष्य आपल्या निरर्थक आयुष्याचे छायारूप दिवस घालवतो, त्यात त्याला काय लाभ होतो ते कोणास ठाऊक? मनुष्याच्या पश्चात भूतलावर काय होईल हे त्याला कोणाच्याने सांगवेल? [उपदेशक 6:12.].
- जीवन हे एका गोष्टी सारखे आहे – जीवन हे मनोरंजन करणाऱ्या गोष्टी प्रमाणे आहे. कोणीतरी तुम्हाला सांगितले असते. नंतर मनुष्य दुसऱ्या मनोरंजना कडे वळतो. जशी गोष्ट संपते तसे जीवन ही संपते.
- जीवन हे वाफे प्रमाणे आहे – वाफ थोडा वेळ दिसते नंतर नाहीशी होते. जीवनही असेच आहे आज आहे आणी उद्या नाही.त्या तुम्हांला उद्याचे समजत नाही; तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते. [याकोब 4:14].
- जीवन हे पाण्यासारखे आहे – जमिनीवर सांडलेले पाणी आम्हाला पुन्हा घेता येत नाही. जमीन ते पाणी शोषून घेते.
आपल्या सर्वांना मरणे प्राप्त आहे; आपण भूमीवर सांडलेल्या पाण्यासारखे आहोत, ते पुन्हा भरून घेता येत नाही; देव प्राणहरण करत नसतो तर घालवून दिलेला इसम आपल्यापासून कायमचा घालवून दिला जाऊ नये अशी योजना करत असतो. [२ शमुवेल 14:14]. - जीवन हे फुला प्रमाणे आहे – बायबल सांगते “स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो. तो फुलासारखा फुलतो व खुडला जातो; तो छायेप्रमाणे सत्वर निघून जातो, राहत नाही. [ईयोब 14:1-2]. काही फुले खूप छान फुलतात तर काहींना फुलण्या आधीच तोडले जाते. जीवन ही असेच आहे कोणी दीर्घ आयुष्य जगतो तर कोणी अर्धे, काहीजण जन्मताच मृत्यूला सामोरे जातात.
जीवनाचा अर्थ काय?
व्याख्या कठीण आहे. जीवन हे वेळेचा क्षण आहे, वन फोर्थ रक्कमे सारखे आहे याच जीवनात आम्हाला अनंत काळच्या जीवनाची तयारी करायची आहे. तुम्ही अनंतकाळ कोठे राहू इच्छिता? दोन अनंतकाळ आहेत. यातील निवड महत्वाची आहे. कारण जीवन संपल्या नंतर याच दोन पैकी एका ठिकाणी आम्हाला जायचे आहे. त्यापैकी एक आहे स्वर्ग जे पवित्र लोकांचे ठिकाण आहे. आणी दुसरे आहे नरक जिथे दुष्ट लोकं पाप केलेले लोकं , यांचे ठिकाण आहे.
मरणानंतर अनेकांना वाटते की सर्व काही संपते. संपत नाही तर खरे जीवन चालू होते स्वर्गातले किंवा नरकातले तेही अनंत काळ या जीवनाला आयुष्य मर्यादा नाही.‘ते तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील.
[मत्तय 25:46].
ज्याला देवाचा पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे; ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. [1 योहान 5:12].
